मालगाव येथील संस्था विलगीकरण कक्षास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:27 IST2021-05-11T04:27:03+5:302021-05-11T04:27:03+5:30

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील एस. एम. हायस्कूलमध्ये सुरू करण्यात आलेल्या संस्था विलगीकरण कक्षातील कोरोनाबाधित ...

Assistance to Institutional Separation Cell at Malgaon | मालगाव येथील संस्था विलगीकरण कक्षास मदत

मालगाव येथील संस्था विलगीकरण कक्षास मदत

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील एस. एम. हायस्कूलमध्ये सुरू करण्यात आलेल्या संस्था विलगीकरण कक्षातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्रहार अपंग संघटनेतर्फे विविध फळांचे वाटप केले. तसेच जिल्हा प्रवासी वाहतूक ॲपे रिक्षा संघटनेतर्फे रुग्णांच्या तपासणीसाठी तापमान मशीन दक्षता समितीकडे देण्यात आल्या.

प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष झाकीर मुजावर यांनी फळे, तर रिक्षा संघटनेचे मिरज येथील महेश चौगुले, मोहसिन सौदागर, जमिर हवालदार, नेताजी नरेंद्र परदेशी यांनी तापमान मशीन दक्षता समितीचे सचिव एस. बी. खरात यांच्याकडे सुपूर्द केली. उपसरपंच तुषार खांडेकर, सदस्य शशिकांत कनवाडे, अजित भंडे, गंगाधर यलपरट्टे, दादासाहेब माळी, नरेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.

Web Title: Assistance to Institutional Separation Cell at Malgaon