पलूस सहकारी बँकेकडून कोरोना सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:49+5:302021-06-16T04:35:49+5:30
पलूस येथे डॉ. पतंगराव कदम कोरोना केअर सेंटरला मदतीचा धनादेश वैभव पुदाले यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्यामराव डाके, ...

पलूस सहकारी बँकेकडून कोरोना सेंटरला मदत
पलूस येथे डॉ. पतंगराव कदम कोरोना केअर सेंटरला मदतीचा धनादेश वैभव पुदाले यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्यामराव डाके, सुहास पुदाले आदी उपस्थित होते.
पलूस : पलूस सहकारी बँकेने तीन महिन्यांचा बैठक भत्ता येथील डॉ. पतंगराव कदम कोरोना केअर सेंटरला मदत म्हणून दिला. बँकेने ५१ हजारांची मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
तालुक्यात उत्तम प्रशासन असणारी बँक म्हणून नावलौकिक असणाऱ्या पलूस सहकारी बँकेचा कारभार अध्यक्ष वैभव पुदाले यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पलूस येथे डॉ. पतंगराव कदम कोरोना केअर सेंटर उभारले आहे. येथे मोफत सुविधा उपलब्ध आहे. वैभव पुदाले यांनी या सामाजिक कार्यास मदत म्हणून पलूस सहकारी बँकेच्यावतीने ५१ हजारांचा बैठक भत्ता या कोरोना सेंटरला दिला आहे. या त्यांच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
मदतीचा धनादेश अमोल भोरे व पलूस नगरपरिषदेचे गटनेते सुहास पुदाले यांच्याकडे अध्यक्ष वैभव पुदाले यांनी सुपूर्द केला. तसेच गरज भासल्यास आणखी मदत करण्याची ग्वाही वैभव पुदाले यांनी दिली.
यावेळी पलूस बँकेचे उपाध्यक्ष श्यामराव डाके, बँकेचे सर्व संचालक मंडळ, नगरसेवक परशुराम शिंदे, मिलिंद डाके, नितीन खारकांडे आदी उपस्थित होते.