बेणापूरच्या बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्रास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:23+5:302021-05-08T04:26:23+5:30
यात्रेनिमित्त भरणारी कुस्ती मैदाने बंद, स्पर्धा बंद, घरची परिस्थिती नाजूक, यामुळे पहिलवानांपुढे खुराकासाठी लागणाऱ्या खर्चाचा मोठा बिकट प्रश्न ...

बेणापूरच्या बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्रास मदत
यात्रेनिमित्त भरणारी कुस्ती मैदाने बंद, स्पर्धा बंद, घरची परिस्थिती नाजूक, यामुळे पहिलवानांपुढे खुराकासाठी लागणाऱ्या खर्चाचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना कुस्ती क्षेत्रात टिकून राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा वेळी रामनगर (मुलाणवाडी) गावचे माजी सरपंच रामभाऊ थोरात व करंजे गावचे संतोष चव्हाण या दानशूर व्यक्तींनी कुस्ती केंद्रातील पहिलवानांना पंचवीस किलो तूप, पंधरा किलो बदाम व इतर खर्चासाठी रोख रक्कम पाच हजार रुपये मदत दिली.
यावेळी खानापूरचे शहाजी भगत, विठ्ठलसिंग रजपूत, संकुलाचे वस्ताद पहिलवान राजेंद्र शिंदे, अन्य पहिलवान उपस्थित होते.
यावेळी कै. बाळासाहेब शिंदे कुस्ती केंद्रांचे वस्ताद राजेंद्र शिंदे यांनी पहिलवानांच्या वतीने मदत केलेल्या मान्यवरांचे आभार मानले. पुढील काळातही कुस्ती क्षेत्रासाठी मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.