शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:21+5:302021-02-24T04:28:21+5:30
ओळी : करोली (टी) येथे अजित भोसले यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिरढोण : वयाच्या ...

शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करा
ओळी : करोली (टी) येथे अजित भोसले यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिरढोण : वयाच्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलाईला नेस्तनाबूत करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. सर्व जातिधर्माच्या मावळ्यांना बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यामुळे आजच्या तरुणपिढीने महाराजांना डोक्यावर तर घ्यावेच आणि त्यांचे आदर्श आणि विचार आत्मसात करावेत, असे आवाहन शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित भोसले यांनी केले.
करोली (टी) (ता. कवठेमहांकाळ) येथे राजे परिवारातर्फे शिवजयंतीनिमित्त भोसले यांचे व्याख्यान आयोजित केले होते. भाेसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशोगाथेने आजच्या तरुणांचे रक्त सळसळले पाहिजे. स्वराज्याचे तोरण बांधत असताना महाराजांनी जाति-पातीच्या भिंती तोडून टाकल्या, त्यांच्या दरबारात आणि सैन्यात सर्वसमावेशक माणसे होती. महाराजांचा बाणेदारपणा डोळ्यांसमोर ठेवावा. करोली गाव शहीद सुरेश चव्हाण या पराक्रमी योद्धांचे गाव आहे. या गावातील नागरिकांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आजी-माजी शिक्षक, पैलवान व प्रतिष्ठानचा सत्कार करण्याचे भाग्य मिळवून दिले.
या कार्यक्रमात प्रशांत लवटेलिखित ‘परिक्रमा पलीकडले शिवराय’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राजे मित्रपरिवारातर्फे हा सोहळा पार पाडण्यासाठी योगेश जगताप, विजय कदम, विक्रम पाटील, संदीप जगताप, सुभाष गिड्डे, भैय्या पाटील, महेश जाधव, सोमनाथ सुतार, नामदेव जगताप, नामदेव कदम, अमित कदम यांच्यासह मावळे उपस्थित होते.