आष्ट्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ नागरिकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:17+5:302021-01-13T05:09:17+5:30

आष्टा : येथील आष्टा-वडगाव मार्गावरील दत्त वसाहत, साईनगर या परिसरातील पिसाळलेल्या कुत्र्याने १० ते १५ जनावरांचा चावा घेतल्याने ...

Assault on 15 civilians by stray dog | आष्ट्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ नागरिकांवर हल्ला

आष्ट्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ नागरिकांवर हल्ला

आष्टा : येथील आष्टा-वडगाव मार्गावरील दत्त वसाहत, साईनगर या परिसरातील पिसाळलेल्या कुत्र्याने १० ते १५ जनावरांचा चावा घेतल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आष्टा-वडगाव मार्गावरील एक कुत्रे पिसाळलेले आहे. साईनगर-दत्त वसाहत या परिसरातील बाळू कोळी व कुमार काळे यांच्यासह १० ते १५ लोकांना हे पिसाळलेले कुत्रे चावल्याने त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या कुत्र्याचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे दत्त वसाहत व साईनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आष्टा पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

चौकट :

आष्टा शहरातील चौकाचौकांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने गल्लीबोळांतून फिरत असताना नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहरात कुत्र्यांची संख्या वाढल्याने पालिकेने तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Assault on 15 civilians by stray dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.