पेठ येथे विठ्ठल मंदिर ते गोळेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:00+5:302021-05-01T04:25:00+5:30

पेठ (ता. वाळवा) येथे विठ्ठल मंदिर ते गोळेवाडी चौकापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ युवा नेते विराज नाईक ...

Asphalting of Vitthal Mandir to Golewadi road started at Peth | पेठ येथे विठ्ठल मंदिर ते गोळेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात

पेठ येथे विठ्ठल मंदिर ते गोळेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात

पेठ (ता. वाळवा) येथे विठ्ठल मंदिर ते गोळेवाडी चौकापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतुल पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, हंबीरराव पाटील, प्रदीप पाटील, हेमंत पाटील, डॉ. अरुण पवार, संतोष देशमाने आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि आ. मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून व युवा नेते अतुल पाटील यांच्या प्रयत्नातून विठ्ठल मंदिर ते गोळेवाडी चौकापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विराज नाईक म्हणाले, मानसिंगराव नाईक यांनी अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न करत आहेत. यावेळी युवा नेते अतुल पाटील, कृषी बाजार समिती माजी सभापती विजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संदीप पाटील, हंबीरराव पाटील, प्रदीप पाटील, माजी सरपंच हेमंत पाटील, डॉ अरुण पवार, संतोष देशमाने, बजरंग सिद , अंबादास पेठकर, डॉ. सुभाष भांबुरे, शिवाजी पाटील, रवींद्र पाटील, अरुण कदम, तुळशीदास पिसे, अशोक पाटील, जयंत पाटील, संग्राम कदम, दीपक जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Asphalting of Vitthal Mandir to Golewadi road started at Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.