शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी कुपवाडच्या व्यापाऱ्याचा शोध, सांगली कनेक्शन उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 13:03 IST

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी ब्रिद्रे बेपत्ता कनेक्शन  सांगलीपर्यंत असल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दीड वर्षापूर्वी बिद्रे बेपत्ता झाल्या, त्यावेळी कुपवाडचा एक व्यापारी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या संपर्कात होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

ठळक मुद्देअश्विनी ब्रिद्रे बेपत्ता, सांगली कनेक्शन उघड कुरुंदकरच्या संपर्कात आल्याची माहितीतपासासाठी मुंबई पोलिस सांगलीत येणार!

सांगली : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी ब्रिद्रे बेपत्ता कनेक्शन सांगलीपर्यंत असल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दीड वर्षापूर्वी बिद्रे बेपत्ता झाल्या, त्यावेळी कुपवाडचा एक व्यापारी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या संपर्कात होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

नवी मुंबई पोलिसांनी या व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाशी रविवारी संपर्क साधला आहे.कुरुंदकर व अश्विनी बिद्रे यांनी सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात एकत्रित नोकरी केली आहे. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांची चांगली ओळख झाली. यातून त्यांच्यातील जवळीकता वाढत गेली.

दोघांनी दोन-तीन महिन्यांच्या अंतराने सांगलीतून जिल्ह्याबाहेर बदली झाली. कुरुंदकरने पालघर जिल्ह्यातील नवघर पोलिस ठाण्यात सेवा बजावल्यानंतर त्याची ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली.

अश्विनी बिद्रे यांची सांगलीतून रत्नागिरीत बदली झाली. दीड वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांची नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात बदली झाली होती. पण त्या तिथे हजर झाल्याच नाहीत. गेली दीड वर्षे त्या बेपत्ता होत्या. त्यांच्या पतीने तशी फिर्याद दिली होती.

दोन दिवसापूर्वी या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. अश्विनी यांच्या पतीने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. कुरुंदकरला तातडीने अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. ज्यावेळी अश्विनी बेपत्ता झाल्या, त्या काळात कुरुंदकरच्या संपर्कात आलेल्या सर्वांची नवी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

कुरुंदकरांचे  कॉल डिटेल्स काढण्यात आले आहेत. यामध्ये कुपवाडमधील एक व्यापारीही कुरुंदकरांच्या संपर्कात आल्याची माहितीमिळाली. या व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधला आहे. हा व्यापारी कोण? याबद्दल रविवारी सांगली, कुपवाडमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. तो नेहमी कुरूंदकर यांना भेटण्यासाठी कुपवाड पोलिस ठाण्यात जात असे.मुंबई पोलिस येणार!अश्विनी बिद्रे बेपत्ता तपासाचे कनेक्शन सांगलीपर्यंत आल्याने नवीन मुंबई पोलिसांचे पथक तपासासाठी कदाचित सांगलीत येण्याची शक्यता आहे. हा व्यापारी कुरुंदकरांच्या संपर्कात का आला होता, याचा उलगडा करण्यासाठी जोरदार तपास सुरू आहे. या व्यापाºयाच्या नावाबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली असल्याचे त्याचे नाव समजू शकले नाही.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली