आष्टा-वडगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST2021-01-18T04:23:53+5:302021-01-18T04:23:53+5:30
आष्टा ते शिगाव येथील चांदोली वसाहतपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. तिथून पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील भादोलेपर्यंत रस्त्याचे काम अपुरे आहे. ...

आष्टा-वडगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
आष्टा ते शिगाव येथील चांदोली वसाहतपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. तिथून पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील भादोलेपर्यंत रस्त्याचे काम अपुरे आहे. चांदोली वसाहत नजीक रस्त्यावर मोठा खडीचा ढीग टाकला होता. या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक उभारला नाही; यामुळे रात्रीच्यावेळी आष्ट्याच्या दिशेने येताना खडी दिसून येत नव्हती. यामुळे शनिवारी रात्री बागणी येथील युवकाला अपघातात जीव गमवावा लागला.
दोन जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता असल्यामुळे या मार्गावर २४ तास वाहतूक सुरू असते. रस्ता अपूर्ण असल्याने अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत. काहींना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी होत आहे. तसेच रस्ता पूर्ण होईपर्यंत ठेकेदारांनी ठिकठिकाणी फलक, रिफ्लेक्टर लावावे तसेच रस्त्यावरील खडीमुळे गाडी स्लिप होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी.
चाैकट
काम पूर्ण व्हावे
शिगाव (ता. वाळवा) येथे रस्त्यालगतच दोन माध्यमिक विद्यालय, दोन मराठी शाळा, अंगणवाडी असल्याने शाळा सुरू होण्याआधी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी पालकांतून होत आहे.
फोटो-१७शिगाव२ व ३
फोटो : शिगाव (ता.वाळवा) येथे चांदोली वसाहतीनजीक शनिवारी रात्री या खडीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू झाला. दुसऱ्या छायाचित्रात अपघाताची माहिती समजताच रविवारी दुपारपर्यंत तेथील खडीचा ढीग गायब झाला.