आष्टा पालिका सभापती निवडी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:07 IST2021-01-13T05:07:27+5:302021-01-13T05:07:27+5:30
आष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे यांची शिक्षण नियोजन व बांधकाम समिती सभापतीपदी, ...

आष्टा पालिका सभापती निवडी बिनविरोध
आष्टा : आष्टा नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे यांची शिक्षण नियोजन व बांधकाम समिती सभापतीपदी, जगन्नाथ बसुगडे यांची स्वच्छता वैद्यक सार्वजनिक आरोग्य व दिवाबत्ती समिती सभापती, झुंजारराव पाटील यांची पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती, शारदा खोत यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी व उपसभापतीपदी पुष्पलता माळी यांची निवड झाली.
तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, राजारामबापू कारखाना संचालक विराज शिंदे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष दिलीप वग्यानी उपस्थित होते.
शिक्षण नियोजन व बांधकाम समिती सदस्य पुढीलप्रमाणे- प्रतिभा पेटारे, शेरनवाब देवळे, धैर्यशील शिंदे, वर्षा औघडे, स्वच्छता वैद्यक सार्वजनिक आरोग्य व दिवाबत्ती समिती सदस्य पुढीलप्रमाणे- शैलेश सावंत, मंगल सिद्ध, संगीता सूर्यवंशी, वीर कुदळे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सदस्य - विशाल शिंदे, सारिका मदने, अर्जुन माने, वर्षा औघडे,
महिला व बालकल्याण समिती सदस्य- संगीता सूर्यवंशी, मंगलादेवी शिंदे, वर्षा औघडे यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. निवडीनंतर तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
चौकट :
उपनगराध्यक्षांना संधी
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सतीश माळी यांच्या पत्नी पुष्पलता माने यांना उपसभापती पदाची सलग चार वर्षे संधी मिळाली आहे.
लोकशाही आघाडीच्या नगरसेविका विमल धोटे यांना एकाही समितीत स्थान मिळाले नाही मात्र वर्षा औघडे यांना तीन समितीत स्थान आहे. उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे या अपक्ष असल्याने या पूर्वी एकाही समितीत नव्हत्या मात्र उपनगराध्यक्ष निवडीनंतर त्यांची थेट शिक्षण नियोजन व बांधकाम समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे.
फोटो : ११०१२०२०-आष्टा पालिका न्यूज
फोटो ओळ : आष्टा पालिकेचे नूतन समिती सभापती तेजश्री बोंडे, झुंजारराव पाटील, जगन्नाथ बसुगडे, शारदा खोत, पुष्पलता माळी यांचा विराज शिंदे, दिलीप वग्याणी, स्नेहा माळी, विशाल शिंदे यांनी सत्कार केला.