आष्टा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुरेश कांबळे सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:29+5:302020-12-05T05:09:29+5:30

आष्टा : आष्टा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी सुरेश कांबळे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार राजारामबापू बँकेचे संचालक जनार्दनकाका पाटील व जिल्हा परिषदेचे ...

Ashta Municipal Administrative Officer Suresh Kamble retired | आष्टा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुरेश कांबळे सेवानिवृत्त

आष्टा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुरेश कांबळे सेवानिवृत्त

आष्टा : आष्टा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी सुरेश कांबळे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार राजारामबापू बँकेचे संचालक जनार्दनकाका पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्याहस्ते झाला.

पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुरेश कांबळे यांना सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी पदवीधर मतदार संघाच्या कासेगाव येथील मतदान केंद्रावर आपली सेवा बजावण्याची संधी मिळाली. सेवानिवृत्तीचा दिवस म्हणून कामाकडे कानाडोळा न करता, या दिवशीही त्याच जोमाने काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व कासेगाव येथे मतदान केंद्रावर आपली सेवा बजावण्यासाठी हजर राहिले.

जनार्दन पाटील म्हणाले, आष्टा नगरपरिषद ही राज्यातील आदर्श नगरपरिषद आहे. केंद्र व राज्याच्या विविध योजना पालिकेने राबविल्या आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना सुरेश कांबळे यांनी सर्वोत्कृष्ट काम केले आहे. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

-

फोटो: ०४१२२०२०-आयएसएलएम- आष्टा पालिका सुरेश कांबळे न्यूज

आष्टा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी सुरेश कांबळे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करताना राजारामबापू बँकेचे संचालक जनार्दन पाटील व माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील यांच्यासह मान्यवर.

Web Title: Ashta Municipal Administrative Officer Suresh Kamble retired