पोषण आहाराची माहिती मागितल्यावरून आष्ट्यात एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST2021-02-09T04:30:32+5:302021-02-09T04:30:32+5:30

दत्त वसाहत येथील इरफान मणेर यांना दोन मुली आहेत. त्या मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल येथे शिकतात. मणेर यांनी ...

Ashta beaten up for asking for nutritional information | पोषण आहाराची माहिती मागितल्यावरून आष्ट्यात एकाला मारहाण

पोषण आहाराची माहिती मागितल्यावरून आष्ट्यात एकाला मारहाण

दत्त वसाहत येथील इरफान मणेर यांना दोन मुली आहेत. त्या मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल येथे शिकतात. मणेर यांनी शालेय पोषण आहार व पटसंख्येबाबत मुख्याध्यापक मोहम्मद हनीफ बागवान यांच्याकडे माहिती मागितली होती. ३ जानेवारी रोजी मणेर शाळेत गेले व मुलींचे बोनाफाइड सर्टिफिकेट मागितले. त्यावेळी मुख्याध्यापक बागवान यांनी रागाने पहिले. दि. ६ रोजी दुपारी एकच्या दरम्यान रुकडे प्रवेशद्वारापासून जात असताना मुख्याध्यापक बागवान व त्यांचा मुलगा अकिब बागवान याने रस्ता अडवून माहिती अधिकाराचा वापर करून का त्रास देतोस, म्हणून बाचाबाची केली व त्यानंतर दत्त वसाहत येथील घरी जात असताना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आकीब बागवान याने लोखंडी जगाने इरफान मणेर यांच्या डोक्यात मारले. त्यांना तातडीने आष्टा ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Web Title: Ashta beaten up for asking for nutritional information