आष्टा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:51+5:302020-12-09T04:21:51+5:30

आष्टा : केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आष्टा येथे मंगळवारी दिवसभर आष्टा ...

Ashta Bandla spontaneous response | आष्टा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

आष्टा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

आष्टा : केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आष्टा येथे मंगळवारी दिवसभर आष्टा शहर बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. बंद शांततेत पार पडला.

केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात विविध शेतकरी संघटनांनी व शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला आष्टा शहरात मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आष्टा बसस्थानक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील बसस्थानक चौक, रुकडे प्रवेशद्वार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शिंदे चौक, गांधी चौक, ज्योतिर्लिंग चौक, गोर्डे चौक यासह कदम वेस, मिरज वेस, दरोजबुवा चौक, अहिल्या चौक, चव्हाणवाडी, शिवाजी चौक, दुधगाव रस्ता या परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. चौका-चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

फोटो: ०८१२२०२०-आयएलएलम- आष्टा न्यूज १ किंवा २

आष्टा शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून भारत बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

Web Title: Ashta Bandla spontaneous response