अशोकराव पाटील यांचे पुण्यात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST2021-03-15T04:24:39+5:302021-03-15T04:24:39+5:30
विटा : चिखलहोळ (ता. खानापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त विक्रीकर सहआयुक्त अशोकराव शांताराम पाटील (वय ७१) यांचे रविवारी ...

अशोकराव पाटील यांचे पुण्यात निधन
विटा : चिखलहोळ (ता. खानापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त विक्रीकर सहआयुक्त अशोकराव शांताराम पाटील (वय ७१) यांचे रविवारी सकाळी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांचे ते वडील होत.
मुंबई येथे विक्रीकर विभागात त्यांनी सुमारे ३५ वर्षे सेवा बजावली. सन २०१०ला ते विक्रीकर सहआयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर शासनाने पुन्हा त्यांना तीन वर्षांसाठी विक्रीकर विभागात पॅनलवर काम करण्याची संधी दिली. सेवानिवृत्तीच्या कालखंडानंतर त्यांनी सामाजिक कामात स्वत:ला झोकून दिले. चिखलहोळ येथे तुळजाभवानी मंदिर उभारणीसह अन्य विकासकामांत त्यांनी मोठे योगदान दिले. विक्रीकर सहआयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावात शेती सांभाळली. परंपरागत शेतीला फाटा देऊन त्यांनी आधुनिक शेती करीत तरूणांना प्रोत्साहन दिले. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून त्यांची प्रकृत्ती बिघडली होती. त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर चिखलहोळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
फोटो - १४०३२०२१-विटा-कै. अशोकराव पाटील, चिखलहोळ. यांचा फोटो वापरणे.