अशोक पाटील प्रामाणिक नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST2020-12-30T04:35:19+5:302020-12-30T04:35:19+5:30

कुरळप (ता. वाळवा) येथे पैलवान अशोकराव पाटील यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ...

Ashok Patil is an honest leader | अशोक पाटील प्रामाणिक नेते

अशोक पाटील प्रामाणिक नेते

कुरळप (ता. वाळवा) येथे पैलवान अशोकराव पाटील यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पी. टी. पाटील, डॉ. मदन शेटे , ॲड. रवी पाटील, सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रणधीर नाईक म्हणाले, अशोकराव पाटील यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने कोरोना काळातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नागरिकांचा विश्वास संपादन करून उत्कृष्ट काम केले. आज प्रसिद्धीसाठी अनेक लोक आपण पाहिले आहेत. याला अशोकराव पाटील अपवाद आहेत.

ॲड. रवी पाटील, राजू पाटील, डॉ. मदन शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लाडेगावचे सरपंच रणधीर पाटील, छोटू पाटील, शोभाताई यादव, उत्तम वायदंडे, सुनील पाटील, दिलीप पाटील, महिंद्र माळी, प्रवीण पाटील, आदी उपस्थित होते. सुनील पाटील यांनी आभार मानले.

फोटो-२८कुरळप१

फोटो ओळ : कुरळप (ता. वाळवा) येथील सामाजिक कार्यकर्ते अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिका वितरण करताना माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, अशोकराव पाटील, शोभाताई यादव, ॲड. रवी पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.

Web Title: Ashok Patil is an honest leader