आशा सेविका खऱ्या कोरोना योद्ध्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:21+5:302021-06-11T04:18:21+5:30

फोटो ओळी : बोरगाव (ता. वाळवा) येथील माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने आशा सेविकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माणिकराव पाटील, संजय ...

Asha Sevika True Corona Warrior | आशा सेविका खऱ्या कोरोना योद्ध्या

आशा सेविका खऱ्या कोरोना योद्ध्या

फोटो ओळी : बोरगाव (ता. वाळवा) येथील माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने आशा सेविकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माणिकराव पाटील, संजय पाटील, डॉ. वैभव नायकवडी, आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

बोरगाव : कोरोनाच्या महामारीत ग्रामीण भागात रुग्णांचे पालकत्व स्वीकारून त्यांची आशा सेविकांनी प्रामाणिक सेवाही केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोविड योद्धा या आशा सेविकाच आहेत. ज्या संक्रमित रुग्णांना कुटुंबांनी वाऱ्यावर सोडले तिथे आशा सेविकांनीच त्यांची सेवा केली. यामुळे त्यांची आपण काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याचे मत राजारामबापू बँकेचे संचालक माणिकराव पाटील यांनी व्यक्त केले.

बोरगाव (ता. वाळवा) येथे माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने आशा सेविकांना सुरक्षा किट वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी होते. माणिकराव पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविला होता.

हार-तुरे यांवर होणऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देत माणुसकी फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला होता. यावेळी डाॅ. प्रज्ञा पाटील, दिलीप पाटील, सखाराम गावडे, कुमार शिंदे, सचिन पाटील, राहुल पाटील, संजय पाटील, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Asha Sevika True Corona Warrior