शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्यातील तब्बल १३ शेतकऱ्यांनी पटकाविला पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 18:32 IST

तीन वर्षांतील पुरस्कारांची घोषणा : शेतीनिष्ठ, कृषिभूषण, शेतीमित्र, युवा शेतकरी, जिजामाता कृषिभूषण, उद्यान पंडित पुरस्कारांचा समावेश

सांगली : शेती आणि शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या विविध पुरस्कारांची घोषणा शासनाने शुक्रवारी केली. यामध्ये शेतीनिष्ठ, कृषिभूषण, शेतीमित्र, युवा शेतकरी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ, उद्यान पंडित आणि जिजामाता कृषिभूषण असे तब्बल १३ पुरस्कार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या शेतकऱ्यांचा शासनाकडून सन्मान करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादनामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विविध कृषी पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील, कृषी सेवारत्न असे पुरस्कार देण्यात येत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक १३ पुरस्कार शेतकऱ्यांनी पटकावले आहेत.

या शेतकऱ्यांचा होणार गौरव२०२२चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार बसवराज शिवपुत्र (शिवाण्णा) कुंभार (संख ता. जत), युवा शेतकरी पुरस्कार धैर्यशील रणधीर पाटील (साखराळे, ता. वाळवा), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार अमोल आनंदराव लकेसर ( दुधारी, ता. वाळवा), २०२१ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जयकर राजाराम माने (सावंतपूर, ता. पलूस), उद्यानपंडित पुरस्कार महेंद्र आनंदराव कदम (विटा, ता. खानापूर), जिजामाता कृषिभूषण पुरस्कार सुलोचना मोहन कदम (कुंडलवाडी, ता. वाळवा), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार तात्यासाहेब रामचंद्र नागावे (खटाव, ता. पलूस),

२०२० चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रमोद अण्णासो पाटील (डिग्रज, ता. मिरज), उद्यानपंडित पुरस्कार रुपेश बाळू गायकवाड (शेटफळे, ता. आटपाडी), युवा शेतकरी पुरस्कार किशोर दीपकराव बाबर (गार्डी, ता. खानापूर), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार विजय बिरजाप्पा रुपनूर (येळवी, ता. जत), जिजामाता कृषिभूषण पुरस्कार मधुमती दयाधन सोनवणे (मालगाव, ता. मिरज), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्रशांत भानुदास पाटील (राडेवाडी-अंकलखोप, ता. पलूस).

टॅग्स :SangliसांगलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी