शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा पाटील यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:58 IST

उपसभापतीपदी सुखदेव पाटील, निवडणुकीत तब्बल ३५ वर्षांनंतर संजयकाका गटाने सत्तांतर घडवून आणले 

तासगाव : तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी कुमठे पंचायत समिती गणाच्या अरुणा पाटील यांची, तर उपसभापतीपदी वायफळे पंचायत समिती गणाचे सुखदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सविता लष्करे यांनी काम पाहिले. यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत तब्बल ३५ वर्षांनंतर संजयकाका गटाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) माध्यमातून सत्तांतर घडवून आणले होते. पंचायत समितीत अजित पवार गटाचे ८, शरद पवार गटाचे ३, तर भाजपचा १ सदस्य विजयी झाला आहे.

वाचा: मिरजेत सभापती निवडीत भाजपला धक्का; काँग्रेसच्या तन्वी कमलेकर विजयीमंगळवारी झालेल्या सभापती व उपसभापती निवडीवेळी अजित पवार गटाकडून सभापती पदासाठी अरुणा पाटील, तर उपसभापती पदासाठी सुखदेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. दुसरीकडे, शरद पवार गटाकडून सभापती पदासाठी कल्पना पाटील आणि उपसभापती पदासाठी विद्याराणी चव्हाण यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, शरद पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी लष्करे यांनी सभापतीपदी अरुणा पाटील, तर उपसभापतीपदी सुखदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.निवडीनंतर माजी खासदार संजयकाका पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी सविता लष्करे, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, डॉ. प्रताप पाटील, बाबासाहेब पाटील, शशिकांत जमदाडे, यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नूतन सभापती व उपसभापतींचा सत्कार केला. यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, महेश पाटील, प्रमोद शेंडगे, ऋषिकेश बिरणे, उमेश पाटील, बालिका माने, राजेश्वरी पाटील उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Aruna Patil Elected Tasgaon Panchayat Samiti Chairperson Unopposed

Web Summary : Aruna Patil and Sukhdev Patil were elected unopposed as Chairperson and Vice-Chairperson of Tasgaon Panchayat Samiti. This follows a power shift after 35 years led by Sanjaykaka's group. Celebrations erupted with supporters showering gulal and setting off fireworks.