पलुस तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अरुण सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST2021-07-11T04:19:38+5:302021-07-11T04:19:38+5:30
अंकलखोप : कृषी विभाग व कृषी क्षेत्र ज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे पलुस तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी संतगांव ...

पलुस तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी अरुण सावंत
अंकलखोप : कृषी विभाग व कृषी क्षेत्र ज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे पलुस तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी संतगांव (ता.पलुस) येथील अरुण सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
पलुस येथील कृषी विभागात सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून कृषी विभागांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. निवडीनंतर सावंत म्हणाले, शेतकरी वर्गासाठी विविध शासन याेजना आहेत. यांत्रिकीकरण योजना, ठिबक सिंचन, फळबाग लागवड, पीकविमा, शेततळे, पीकस्पर्धा, फळ पीकविमा योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड, बांधावर लागवड यांसारख्या शासन याेजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
या निवडीच्या वेळी पलुस तालुका कृषी अधिकारी एस.जी. निकम, कृषी अधिकारी आय.एच. चव्हाण, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रशांत पाटील, धनश्री काटकर यांच्यासह सर्व सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते.