अरुण रेळेकर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:24+5:302021-04-05T04:23:24+5:30
कोकरुड : चरण (ता. शिराळा) येथील ग्रामसेवक अरुण रमेश रेळेकर यांना सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा पद्मभूषण डॉ. ...

अरुण रेळेकर यांचा सत्कार
कोकरुड : चरण (ता. शिराळा) येथील ग्रामसेवक अरुण रमेश रेळेकर यांना सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी अरविंद माने, विस्तार अधिकारी रवींद्र मठकरी, प्रकाश शिंदे, ग्रामसेवक राज्य कार्यकारिणीच्या सदस्या शुभांगी मस्के, तालुका संघटनेचे अध्यक्ष एम. एन. पाटील, उपाध्यक्ष कुमार भिंगारदिवे, ज्येष्ठ ग्रामविकास अधिकारी आर. बी. पाटील तसेच सर्व तालुका ग्रामसेवक कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.