अशोका ॲग्रोतर्फे अरुण लाड यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:51 IST2020-12-17T04:51:38+5:302020-12-17T04:51:38+5:30

आष्टा : पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका ॲग्रो फर्ट व अशोका ॲग्रो सोल्युशनच्यावतीने नूतन आमदार अरुण लाड यांचा, संस्थापक-संचालक ...

Arun Lad felicitated by Ashoka Agro | अशोका ॲग्रोतर्फे अरुण लाड यांचा सत्कार

अशोका ॲग्रोतर्फे अरुण लाड यांचा सत्कार

आष्टा : पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका ॲग्रो फर्ट व अशोका ॲग्रो सोल्युशनच्यावतीने नूतन आमदार अरुण लाड यांचा, संस्थापक-संचालक सतीश पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वितरण व्यवस्थापक श्रीकांत माळी, निवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ जाधव उपस्थित होते.

यावेळी सतीश पाटील म्हणाले, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी जीवनभर शेतकऱ्यांचे हित जपले. त्यांचा वारसा आमदार अरुण लाड यांनी समर्थपणे जपला आहे. त्यांची निवड ही सर्वसामान्य जनतेची आहे.

आमदार अरुण लाड म्हणाले, पोखर्णी येथील अशोका ॲग्रो उद्योग समूहाने सेंद्रिय खते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवून शेतकऱ्यांचा विकास साधला आहे. सेंद्रिय खते देश-विदेशात निर्यात करीत गावाचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवले आहे.

फोटो : १६आष्टा०१

फोटो:

पोखर्णी (ता. वाळवा) येथे नूतन आमदार अरुण लाड यांचा सत्कार अशोका ॲग्रोचे संस्थापक सतीश पाटील यांनी केला. यावेळी श्रीकांत माळी, विश्‍वनाथ जाधव उपस्थित होते.

Web Title: Arun Lad felicitated by Ashoka Agro