गोटखिंडीचे विनायक गुरव यांना कला सन्मान पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:37+5:302021-09-26T04:28:37+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील तबलावादक विनायक गुरव यांना तबलावादन क्षेत्रात आर्ट बिट्स फाउंडेशन (पुणे) यांच्याकडून आर्ट ...

गोटखिंडीचे विनायक गुरव यांना कला सन्मान पुरस्कार
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील तबलावादक विनायक गुरव यांना तबलावादन क्षेत्रात आर्ट बिट्स फाउंडेशन (पुणे) यांच्याकडून आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला. लवकरच तो प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना पंडित मनमोहन कुंभारे व पंडित आनंद सिद्धये यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्यांना अनेक शास्त्रीय गायकांसोबत तबलावादन करण्याची संधी मिळाली. यामध्ये पंडित शौनक अभिषेकी, पंडित जयतीर्थ मेवुंडी, पंडित संजय गरुड, डॉ. रवींद्र गांगुर्डे, पार्श्वगायिका सावनी रवींद्र निराली, कार्तिक अंतरा नंदी, पंडित धनंजय दैठणकर, संतूरवादक ताका हिरो आराई (जपान), नॅश रॉबर्ट (अमेरिका), बासरी वादक पं. शैलेश भागवत, प्रमोद गायकवाड अशा अनेक कलाकारांना साथ-संगत केली असून पुणे येथे तबला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.