कुपवाडमध्ये चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST2021-03-14T04:24:41+5:302021-03-14T04:24:41+5:30
सांगली : कुपवाड येथे चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. विजय राजू मस्के (वय ...

कुपवाडमध्ये चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यास अटक
सांगली : कुपवाड येथे चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. विजय राजू मस्के (वय २३, रेवणी गल्ली, मिरज) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी विश्रामबाग, संजयनगर, शहर, कुपवाड एमआयडीसी, मिरज ग्रामीण, मिरज शहरात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांवर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक कुपवाड परिसरात गस्तीवर होते. यावेळी सूतगिरणी ते कुपवाड रस्त्यावर अंधारात एकजण संशयास्पदरीत्या थांबल्याचे दिसून आल्यानंतर त्यास ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, सचिन धोत्रे, आर्यन देशिंगकर, शशिकांत जाधव, विकास भोसले, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.