चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:31+5:302021-01-08T05:29:31+5:30
कडेगावमधील एकास मारहाण सांगली : कडेगाव येथील पृथ्वीराज सिद्धू मदने (वय २४) या तरुणास मारहाण करून जखमी करण्यात आली. ...

चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यास अटक
कडेगावमधील एकास मारहाण
सांगली : कडेगाव येथील पृथ्वीराज सिद्धू मदने (वय २४) या तरुणास मारहाण करून जखमी करण्यात आली. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
...
दुचाकीवरून पडल्याने एक जखमी
सांगली : दुचाकीवरून पडल्याने सनी धोंडीराम अवघडे (वय २१) हा तरुण जखमी झाला. कुंडल रस्त्यावर हा अपघात झाला. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
...
सांगलीतील वृद्धास सर्पदंश
सांगली : इंदिरानगर परिसरातील अण्णाप्पा परसू कांबळे (वय ६५) या वृद्धास सर्पदंश झाला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
...
अपघातात दोघे जखमी
सांगली : कवठेएकंद येथे झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. प्रवीश महादेव गायकवाड (वय ४०, रा. माळवाडी) आणि मेघराज बबन शिंदे (२५, रा. कवठेएकंद) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी पाचच्यासुमारास उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.