मिरजेत पिस्तूल विकणाऱ्यास अटक

By Admin | Updated: March 1, 2015 00:12 IST2015-03-01T00:12:00+5:302015-03-01T00:12:41+5:30

चार दिवस पोलीस कोठडी

Arrested in black pepper pistol | मिरजेत पिस्तूल विकणाऱ्यास अटक

मिरजेत पिस्तूल विकणाऱ्यास अटक

मिरज : मिरजेत गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या अरुण शाहदेव काकड (वय २७, रा. जांब, ता. मुळशी, पुणे) यास शुक्रवारी गुंडाविरोधी पथकाने पकडले. त्यास न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
काकड हा मुळशी येथे खासगी मोटारीवर चालक म्हणून काम करतो. बीड येथील एका गुन्हेगाराने त्यास गावठी पिस्तूल विक्रीसाठी दिले होते. गुंडाविरोधी पथकाचे निरीक्षक बाजीराव पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावला. बोगस ग्राहकाव्दारे काकडला मिरजेत गांधी चौकात बोलाविण्यात आले. मोटारीतून (क्र. एमएच १४, सीएक्स ६३७५) आलेल्या काकड यास गावठी पिस्तुलासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. काकड यास दहा हजार रुपये कमिशनवर पिस्तूल विक्रीसाठी देणाऱ्या गुन्हेगारास ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक बीडला जाणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Arrested in black pepper pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.