शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कुंडलमध्ये फरारी गुन्हेगारास अटक; गंभीर गुन्हे : १४ वर्षे गुंगारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:39 AM

गुजरात पोलीस दलात चोरी, फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल झालेल्या कुंडल (ता. पलूस) येथील सचिन बबनराव लाड (वय ४०) या फरारी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. तो १४ वर्षे पोलिसांना गुंगारा देत फरार होता.

ठळक मुद्देकुंडलमध्ये फरारी गुन्हेगारास अटकगंभीर गुन्हे : १४ वर्षे गुंगारा

सांगली : गुजरात पोलीस दलात चोरी, फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल झालेल्या कुंडल (ता. पलूस) येथील सचिन बबनराव लाड (वय ४०) या फरारी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी अटक केली. तो १४ वर्षे पोलिसांना गुंगारा देत फरार होता.जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी रेकॉर्डवरील फरारी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. कुंडल येथील सचिन लाड याच्याविरुद्ध गुजरातमधील पादरा पोलीस ठाण्यामध्ये चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तेथील पोलीस त्याच्या मागावर होते, पण तो सापडत नाही, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाली.

पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, कुंडलच्या सहायक निरीक्षक जयश्री पाटील, पोलीस शिपाई सतीश आलदर, सचिन कनप, कुबेर खोत यांच्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला, त्यावेळी लाड सापडला. त्याला ताब्यात घेतल्याची नोंद कुंडल पोलीस ठाण्यात करण्यात आली.

पादरा पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून, ते त्याला ताब्यात घेण्यासाठी सांगलीत दाखल झाले आहेत. गुजरात पोलिसांना १४ वर्षे गुंगारा देत तो फरार होता.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली