बागणीतील खासगी सावकारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:28 IST2021-05-09T04:28:08+5:302021-05-09T04:28:08+5:30
आष्टा : दहा टक्के व्याजदराने मुद्दल व व्याज देऊनही सावकाराने स्लॅबचे मिक्सर व मशीन घेतल्याप्रकरणी बागणी (ता. वाळवा) येथील ...

बागणीतील खासगी सावकारास अटक
आष्टा : दहा टक्के व्याजदराने मुद्दल व व्याज देऊनही सावकाराने स्लॅबचे मिक्सर व मशीन घेतल्याप्रकरणी बागणी (ता. वाळवा) येथील नितीन सुनील सुर्वे या खासगी सावकाराला आष्टा पोलिसांनी अटक केली.
पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी खासगी सावकारांविरोधात तक्रार देण्याचे आवाहन केले होते.
बागणी येथील सावकार नितीन सुर्वे याने विशाल सर्जेराव पोसुगडे (बागणी) यांना २० मे २०२० रोजी ७० हजार रुपये १० टक्के व्याजाने दिले होते. या पैशांचे व्याज व दंड असे एकूण ७६ हजार वसूल करूनही उरलेले व्याज दिले नाही, म्हणून जानेवारीत विशाल पोसुगडे यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक सीजी ३५७९) जबरदस्तीने काढून घेतली.
मार्चमध्ये विशाल पोसुगडे यांच्या घरातील टीव्ही घेऊन जात असताना सोन्याचे गंठण, बुगडी दिल्यानंतर सुर्वे याने ते दागिने खासगी बँकेत ठेवून त्यावर १८ हजार रुपये काढून व्याजाचे व दंडाचे असे एकूण २४ हजार रुपये वसूल केले. पुन्हा मुद्दल व दंडापोटी एकूण ८० हजारांची मागणी केली. फोनवर धमकी दिली. ७ मे रोजी पोसुगडे यांच्या मालकीचे स्लॅबचे मिक्सर व मशीन जबरदस्तीने घेऊन गेला.
याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सुर्वे याला अटक केली.