करोली (एम) येथील लष्करी जवानाचा दिल्लीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:12+5:302021-03-07T04:24:12+5:30

मिरज : करोली (एम) (ता. मिरज) येथील लष्करी जवान उमेश चंद्रकांत पाटील (वय ४०) यांचा प्रकृती बिघडल्याने दिल्लीत अकस्मात ...

Army soldier from Karoli (M) dies in Delhi | करोली (एम) येथील लष्करी जवानाचा दिल्लीत मृत्यू

करोली (एम) येथील लष्करी जवानाचा दिल्लीत मृत्यू

मिरज : करोली (एम) (ता. मिरज) येथील लष्करी जवान उमेश चंद्रकांत पाटील (वय ४०) यांचा प्रकृती बिघडल्याने दिल्लीत अकस्मात मृत्यू झाला. ते १७ गार्ड बटालियन बिकानेर (राजस्थान) येथे हवालदार या पदावर काम करीत होते. आज रविवारी दुपारी उमेश पाटील यांचे पार्थिव गावी आणण्यात येणार आहे.

उमेश पाटील हे २००२ मध्ये १७ गार्ड बटालियनमध्ये भरती झाले होते. लष्करात कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने बिकानेर येथील सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने शुक्रवारी रात्री दिल्लीत सैनिक रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. उमेश यांचे भाऊ महेश पाटील हेसुद्धा लष्करात सुभेदार आहेत.

उमेश पाटील यांचे पार्थिव रविवारी सकाळी पुण्यात व दुपारी दोन वाजता गावी आणण्यात येणार आहे. करोली (एम) गावात अंत्ययात्रा काढून सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. उमेश पाटील यांनी कामठी, बिकानेर, बारनेर, जम्मू-काश्मीर, केरळ व अहमदाबाद येथे सेवा बजावली होती. त्यांच्या अकस्मात मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

Web Title: Army soldier from Karoli (M) dies in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.