अरबांची लूट; एजंटांवर पोलीस कारवाई करणार
By Admin | Updated: November 16, 2014 23:54 IST2014-11-16T22:49:20+5:302014-11-16T23:54:46+5:30
लोकमत प्रभाव--अरबांवर उपचार करणाऱ्या काही रुग्णालयांचाही लॉजिंगप्रमाणे वापर सुरू आहे.

अरबांची लूट; एजंटांवर पोलीस कारवाई करणार
मिरज : मिरजेत अरबांची लूटमार करून अवैध व्यवसाय करणाऱ्या एजंटांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अरबांच्या एजंटांच्या या कृत्यांबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अनेक एजंट गायब झाले आहेत.
वैद्यकीय उपचार व पर्यटनाच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या अरबांना लुबाडण्यासाठी एजंटांत तक्रारी सुरू झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांनंतर मिरजेत पुन्हा अरबांचा ओघ सुरू झाल्याने अरब कोणाचा? यावरून एजंटांत संघर्ष सुरू आहे. एजंटगिरी करण्यासाठी कर्नाटकातून काहीजण मिरजेत आले आहेत. लॉजवर होणाऱ्या गैरप्रकारांना पोलिसांनी प्रतिबंध केल्यामुळे काही एजंटांनी शंभर फुटी रोड परिसरात खासगी बंगल्यात अरबांची सोय केली आहे. अरबांवर उपचार करणाऱ्या काही रुग्णालयांचाही लॉजिंगप्रमाणे वापर सुरू आहे. काही एजंटांच्या अनधिकृत लॉजिंगची पोलीस चौकशी करणार आहेत. तोतया पोलीस बनून अरबांची लुबाडणूक व उपचारासाठी ठराविक रूग्णालयात नेऊन अनावश्यक उपचार व शस्त्रक्रिया करून अरबांकडून पैसे उकळले जातात. इरफान, सना, गौस, दादापीर, अस्लम, नजीर नामक एजंट गुंतल्याच्या तक्रारींची चौकशी होणार आहे. (वार्ताहर)