अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रमांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST2021-08-23T04:29:30+5:302021-08-23T04:29:30+5:30
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून बी टेक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स व ...

अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रमांना मान्यता
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून बी टेक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स व बी टेक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आयओटी सायबर सिक्युरिटी व ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव ॲड. चिमण डांगे व संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई यांनी दिली.
प्रा. आर. ए. कनाई म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स आयओटी सायबर सिक्युरिटी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाची आज भारतासारख्या विकसनशील देशाला खूप गरज आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनेही या उदयोन्मुख अभ्यासक्रमास प्रथम पसंती दिली आहे. सर्व कारखान्यांमध्ये संगणकाचा वापर वाढला आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या तंत्रज्ञानाची गरज आहे. हा शब्द आज परवलीचा बनला आहे. संगणकाच्या वेगवान जाळ्यांमुळे सर्व बाबी ऑनलाईन झाल्या आहेत. संगणकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर प्रचंड प्रमाणात माहिती संकलित केली जात आहे. या माहितीचे योग्य विश्लेषण करून त्याचा योग्य वापर करू शकणारे अभियंते घडवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.
संचालक डॉ. विक्रम पाटील यांनी महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रा. शैलेंद्र हिवरेकर, डॉ. सुयोग तारळकर, प्रशासकीय अधिकारी दीपक अडसूळ व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.