उमदी-विजापूर मार्गाच्या रखडलेल्या कामास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST2021-02-09T04:28:53+5:302021-02-09T04:28:53+5:30
ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून करमाळा ते विजापूर या ३०० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यातील करमाळा ...

उमदी-विजापूर मार्गाच्या रखडलेल्या कामास मंजुरी
ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून करमाळा ते विजापूर या ३०० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यातील करमाळा ते उमदीपर्यंतची कामे पूर्णत्वाला आली आहेत. मात्र, उमदी ते विजापूरपर्यंतच्या कामास मंजुरी मिळाली नव्हती. यासाठी विजापूरचे खासदार रमेश जिगजणी, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तम्मानगौडा रवी पाटील यांनी निवेदन देऊन पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेत उमदी ते विजापूर कामास मंजुरी दिली आहे. उमदी ते कोणत्याव-बोबलाद या कामास ६२ कोटी रुपये, तर सिद्धापूर ते विजापूर या रस्त्याच्या कामासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
यावेळी राजू चव्हाण, चिदानंद रगटे, रवी लोणी, राजू स्वामी, आदी मान्यवर उपस्थित होते.