शिराळा उपजिल्हा रुग्णालय, वाटेगाव आरोग्य केंद्रात पदांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:14+5:302021-06-09T04:35:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा उपजिल्हा रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने २० पदांना, तर वाटेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ...

शिराळा उपजिल्हा रुग्णालय, वाटेगाव आरोग्य केंद्रात पदांना मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा उपजिल्हा रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने २० पदांना, तर वाटेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ पदांना मंजुरी दिली आहे. उपजिल्हा रुग्णालयात पूर्वीची व नवीन मिळून पदांची संख्या ४५ होणार आहे, ही माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, पाठपुरावा करून ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास १७ जानेवारी २०१३ ला मंजुरी मिळविली. त्याच्या उभारणीसाठी १४ कोटी ७९ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून इमारत उभी राहिली. येथे पूर्ण क्षमतेने अधिकारी व कर्मचारी वर्गाची भरती करावी अशी मागणी केली होती. पुढे कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला आणि भरती प्रक्रिया थांबली होती. आता शासनदरबारी सातत्याने प्रयत्न करून २० पदांची मंजुरी मिळविली आहे. जुनी व नवीन मंजूर पदे मिळून ४५ स्टाफ होणार आहे. वाटेगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ पदे मंजूर झाली आहेत. कोरोना संसर्ग सुरू असताना पदांना मंजुरी देऊन शासनाने मतदारसंघाला दिलासा दिला आहे.