इस्लामपूर येथे शासकीय योजनेच्या १२० प्रकरणांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:24+5:302021-09-04T04:32:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : संजय गांधी निराधार समितीच्या विविध योजनांचा लाभ वाळवा तालुक्यातील तळागाळातील शेवटच्या माणसालाही मिळायला हवा, ...

इस्लामपूर येथे शासकीय योजनेच्या १२० प्रकरणांना मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : संजय गांधी निराधार समितीच्या विविध योजनांचा लाभ वाळवा तालुक्यातील तळागाळातील शेवटच्या माणसालाही मिळायला हवा, यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी व्यक्त केला. या महिन्याच्या बैठकीमध्ये १२० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
येथील तहसीलदार कार्यालयामध्ये पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. यावेळी नायब तहसीलदार धनश्री भांबुरे उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजनेची ९४ प्रकरणे, श्रावण बाळ योजनेची २२ प्रकरणे, इंदिरा गांधी योजनेचे दिव्यांग १ प्रकरण व वृद्धापकाळ योजनेतील ३ प्रकरणांचा समावेश आहे. ३ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्या-त्या व्यक्तींना कागदपत्रांच्या पूर्ततेची सूचना केली जाणार आहे.
संजय पाटील म्हणाले, संजय गांधी निराधार समिती ही राज्य शासनाची समिती आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या माध्यमातून समाजातील दिव्यांग, वृध्द, विधवा, परित्यक्ता आदी वंचित घटकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा सर्व पात्र व्यक्तींना लाभ मिळाला पाहिजे, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्हाला त्यात यश मिळत आहे.
या बैठकीस समितीचे सदस्य रामभाऊ पाटील, युवराज कांबळे, दिनकर धोंडी पाटील, संदीप माने, राहुल टिबे, सुहास रुगे, हेमंत पाटील, इलियास नायकवडी, महसूल सहायक बी. एम. कदम, गायत्री खटावकर, धनश्री पवार उपस्थित होत्या.