कुपवाडसाठी स्वतंत्र नवीन दोन तलाठ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:54+5:302021-02-06T04:49:54+5:30
कुपवाड येथील तलाठी कार्यालयात तलाठी आणि कोतवाल यांचा मनमानी कारभार सुरू आहे. या ठिकाणी एजंटांची कामे जलदगतीने होतात. मात्र, ...

कुपवाडसाठी स्वतंत्र नवीन दोन तलाठ्यांची नियुक्ती
कुपवाड येथील तलाठी कार्यालयात तलाठी आणि कोतवाल यांचा मनमानी कारभार सुरू आहे. या ठिकाणी एजंटांची कामे जलदगतीने होतात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रलंबित आहेत, अशा तक्रारी काही नागरिकांनी व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी कुपवाड, बामणोली, वानलेसवाडी येथील तलाठी कार्यालयातील तलाठी, कोतवाल यांची अन्यत्र बदली कराण्याचा प्रस्ताव मिरजेचे प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केला होता.
त्यानुसार, प्रांताधिकारी शिंगटे यांनी कुपवाड येथील तलाठी कार्यालयात नवीन शिवाजी सकरे (कवठेपिरान) यांची तलाठी म्हणून नियुक्ती केली आहे.
वादग्रस्त कोतवाल नागेश सायमोते यांची दुधगाव येथे व यशवंत ऐडके यांची कसबे डिग्रज येथे बदली केली आहे, तर संगीता परेश पाटील यांची बामणोली, वानलेसवाडी तलाठी म्हणून नियुक्ती केली आहे. बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले आहेत.