शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

सांगली जिल्हा बँकेच्या घोटाळ्याची जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक

By अशोक डोंबाळे | Updated: July 13, 2024 19:11 IST

दिलीप वळसे-पाटील यांचे पडळकरांच्या प्रश्नाला उत्तर : तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जदार संस्थांना बनावट कर्ज वाटप केल्याचे निदर्शनास आलेले नाही. मात्र कामकाजाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने कोल्हापूर विभागीय सहनिबंधक यांनी केलेल्या चौकशीनुसार दोषींवर कारवाई केली आहे. जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यानुसार चौकशी सुरू असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.जिल्हा बँकेमध्ये गैरव्यवहारप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलल्या लक्षवेधीला मंत्री वळसे-पाटील यांनी उत्तर दिले. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ''जिल्हा बँकेने कर्जदार संस्थांना बनावट कर्ज वाटप केल्याचे निदर्शनास आलेले नाही. विभागीय सहनिबंधकांनी केलेल्या चौकशीनुसार बँकेने २०१२-२०१३ व २०१९-२०२० कालावधीत तीन कंपन्यांना मंजूर केलेल्या कर्जप्रकरणात अनियमितता आढळली आहे. बँकेने २०१९ मध्ये केलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या नोकर भरतीत दोघांनी अनुभवाचे बनावट दाखले सादर केल्याचे आढळले.त्याअनुषंगाने कारवाई केली जात आहे. चौकशीसाठी सहकार आयुक्तांनी नेमलेल्या विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने अहवाल दिला आहे. त्यानुसार विभागीय सहनिबंधकांनी कलम ८३ अन्वये सहकार उपनिबंधक कऱ्हाड यांनी अहवाल सादर केला आहे. त्यात तांत्रिकपदांच्या भरतीच्या अनुषंगाने बँकेस कारवाईचे आदेश दिले आहेत.''बँकेने सहा मालमत्ता सरफेसी कायद्यान्वये २६४ कोटी रुपयांस खरेदी केल्या आहेत. त्यापैकी दोन मालमत्ता बँकेने भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्या. चार मालमत्ता बँकेच्या ताब्यात आहेत. सध्या चौकशीचे कामकाज सुरू असल्याचे मंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले. चर्चेत आमदार अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाbankबँकGopichand Padalkarगोपीचंद पडळकरDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील