मयूर औंधकर यांची वैद्यकीय अधिकारी गट (अ) पदी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:40+5:302021-07-14T04:31:40+5:30
कुपवाड : शहरामधील महापालिका आरोग्य केंद्राचे डॉ. मयूर औंधकर यांची आरोग्य भवन मुंबई येथे झालेल्या मुलाखतीतून महाराष्ट्र शासन वैद्यकीय ...

मयूर औंधकर यांची वैद्यकीय अधिकारी गट (अ) पदी नियुक्ती
कुपवाड : शहरामधील महापालिका आरोग्य केंद्राचे डॉ. मयूर औंधकर यांची आरोग्य भवन मुंबई येथे झालेल्या मुलाखतीतून महाराष्ट्र शासन वैद्यकीय अधिकारी गट (अ) पदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टनकोडोली (ता. हातकणंगले) या ठिकाणी त्यांची नेमणूक झाली आहे.
शहरातील सर्वसामान्यांचे डॉक्टर म्हणून औंधकर यांनी छाप पाडली होती. मे २०२० पासून ते महापालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले होते. तेव्हापासून कुपवाड व परिसरातील वृद्ध, तरुण, महिला रुग्णांचा महापालिका आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येण्याचा कल वाढला होता. डॉ. औंधकर यांनी कोरोना काळात वैद्यकीय सेवेबरोबर रुग्णांना मानसिक आधार व त्यांचे मनोधर्य वाढवण्याचे काम केले. त्यामुळे रुग्णाचा ओढा महापालिका दवाखान्याकडे वाढला होता. लसीकरण, कोविड रुग्ण तपासणी, बाह्यरुग्ण विभाग, स्वॅब चाचण्या, गृह विलगीकरणातील रुग्णाची तपासणी अशी जबाबदारी त्यांच्यावर होती.