जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:43+5:302021-09-21T04:28:43+5:30

दुसरीकडे संख अप्पर तहसील कार्यालयाला अद्याप अप्पर तहसीलदार यांची प्रतीक्षा आहे. प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांचेही बदलीचे आदेश निघाले असून ...

Appointment of Jeevan Bansode as Jat Tehsildar | जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांची नियुक्ती

जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांची नियुक्ती

दुसरीकडे संख अप्पर तहसील कार्यालयाला अद्याप अप्पर तहसीलदार यांची प्रतीक्षा आहे. प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांचेही बदलीचे आदेश निघाले असून त्यांच्या जागेवर रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोंगेद्र कट्यारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे संख अप्पर तहसील कार्यालयाला अद्याप अप्पर तहसीलदारांची प्रतीक्षा कायम आहे. पावणेतीन महिन्यापूर्वी संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे हे लाचलुचपत विभागाच्या कारवाईत पकडल्यापासून हे पद रिक्तच आहे.

संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत काही महिन्यांपूर्वी संख येथील अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पकडल्या पासून, त्यांच्या जागी अद्याप नूतन अप्पर तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली नाही. तसेच तलाठीही वेळेवर जागेवरती हजर नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. संख अप्पर तहसील परिसरातील सेतू कार्यालय व एजंटांकडून नागरिकांची प्रचंड लूट केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारावर संख परिसरातील नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Appointment of Jeevan Bansode as Jat Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.