शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची नियुक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:47+5:302021-08-14T04:32:47+5:30
सांगली : सांगली व मिरज शासकीय रुग्णालयांतील ४० तज्ज्ञ डॉक्टरांची सातारा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश देण्यात ...

शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची नियुक्ती करा
सांगली : सांगली व मिरज शासकीय रुग्णालयांतील ४० तज्ज्ञ डॉक्टरांची सातारा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश देण्यात आल्याने सांगली, मिरजेतील आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांत डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समितीच्यावतीने करण्यात आली. समितीचे जिल्हाध्यक्ष उमर गवंडी यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
दोन्ही शासकीय रुग्णालयांत ४० प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. या भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही झाली नाही. सातारा येथे नियुक्ती करण्यात आलेल्या डॉक्टरांना तेथून कार्यमुक्त करून पुन्हा एकदा सांगली, मिरजेत त्यांना रुजू करून घ्यावे जेणेकरून रुग्णांची सेवा पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. डॉक्टरांची पुन्हा नेमणूक न झाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला. यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.