उद्योगवाढीसाठी केंद्राच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:09+5:302021-09-05T04:30:09+5:30
सांगलीत उद्योगमित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. यावेळी प्रदीप पेशकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर ...

उद्योगवाढीसाठी केंद्राच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
सांगलीत उद्योगमित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. यावेळी प्रदीप पेशकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, उद्योजक संजय आराणके, रमेश आरवाडे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : उद्योगवाढीसाठी केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग बोर्डाचे सदस्य व उद्योगमित्रचे संस्थापक प्रदीप पेशकर यांनी केले. उद्योगमित्रच्या सांगली शाखा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजय राठोड यावेळी उपस्थित होते. पेशकर म्हणाले की, स्थानिक उद्योजकांना देश व राज्य पातळीवर येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम उद्योगमित्र करेल. उद्योजकांनी निर्यातक्षम उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करावे. केंद्र शासन पूर्णत: त्यांच्या पाठीशी असेल. यावेळी सांगली शाखेच्या अध्यक्षपदी संजय अराणके, उपाध्यक्षपदी रमेश आरवाडे, सरचिटणीसपदी शरद नलावडे, सचिवपदी आनंद जोशी आणि कोषाध्यक्षपदी योगेश राजा यांच्या निवडी करण्यात आल्या.
औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी सतीश मालू, संजय खांबे आदींनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी यावेळी मांडल्या. कार्यक्रमाला केंद्रीय जीएसटी विभागाचे निरीक्षक राजेंद्र मेढेकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक हजारे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, रवींद्र भिडे, अक्षय जोशी, विशाल गायकवाड आदी उद्योजक व अधिकारी उपस्थित होते.
चौकट
उद्योजकांच्या अडचणी मांडल्या
उद्योगमित्रच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. यावेळी प्रदीप पेशकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, दीपक शिंदे-म्हैसाळकर, उद्योजक संजय अराणके, रमेश आरवाडे आदी उपस्थित होते. उद्योजकांच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या.