कृषी पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव देण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:25+5:302021-08-25T04:32:25+5:30
सांगली : विविध कृषी पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. ...

कृषी पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव देण्याचे आवाहन
सांगली : विविध कृषी पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न राज्यस्तरीय पुरस्कार (७५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह), वसंतराव नाईक कृषिभूषण (रोख ५० हजार रुपये व स्मृतिचिन्ह), कर्तबगार महिला शेतकऱ्यांसाठी जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (रोख ५० हजार रुपये), पत्रकारिता अथवा अन्य मार्गांनी कृषीविषयक ज्ञानाच्या प्रसाराबद्दल वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (रोख ३० हजार रुपये व स्मृतिचिन्ह) असे पुरस्कार आहेत. प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (रोख ११ हजार रुपये व स्मृतिचिन्ह), सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण (रोख ५० हजार रुपये व स्मृतिचिन्ह), फलोत्पादनासाठी उद्यानपंडित पुरस्कार (रोख २५ हजार), कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार, तरुण शेतकऱ्यांसाठी युवा शेतकरी पुरस्कार (रोख ३० हजार रुपये) देण्यात येतील.