पूरबाधित घरे, दुकाने व शेतातील विद्युत यंत्रणेच्या तपासणीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST2021-07-29T04:27:32+5:302021-07-29T04:27:32+5:30

मिरज : जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी आपली दुकाने व घरातील वीज संच मांडणी पाण्यामध्ये भिजली ...

Appeal for inspection of flood-damaged houses, shops and farm electrical systems | पूरबाधित घरे, दुकाने व शेतातील विद्युत यंत्रणेच्या तपासणीचे आवाहन

पूरबाधित घरे, दुकाने व शेतातील विद्युत यंत्रणेच्या तपासणीचे आवाहन

मिरज : जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी आपली दुकाने व घरातील वीज संच मांडणी पाण्यामध्ये भिजली असल्यास त्याची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन विद्युत निरीक्षक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

ज्या पूरबाधित शेतकऱ्यांच्या शेतात शेतीपंपाची मीटर पेटी व मोटर पुराच्या पाण्यात भिजली असल्यास वीज सुरु करण्यापूर्वी वीज संच मांडणी अधिकृत व्यक्तीकडून तपासून सुस्थितीत व धोकाविरहीत असल्याची खात्री करुनच वीज सुरु करावी. तसेच लहान मुलांना वीज संच मांडणी हाताळण्यास मज्जाव करावा. महावितरणच्या तारा व खांब पुराच्या पाण्यामुळे वाकले, तुटले किंवा तुटून जमिनीवर पडले असल्यास तुटलेल्या तारांना स्पर्श करु नये. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्युत निरीक्षक शहाजी कोळी यांनी केले आहे.

Web Title: Appeal for inspection of flood-damaged houses, shops and farm electrical systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.