अ‍ॅपेक्स प्रकरणी आणखी दोन डाॅक्टरांची पोलीस चाैकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:14+5:302021-07-07T04:34:14+5:30

मिरजेतील अ‍ॅपेक्स रुग्णालयात ८७ कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयचालक डाॅ. महेश जाधव व त्याचा भाऊ मेंदू शास्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. ...

In the Apex case, two more doctors will be chased by the police | अ‍ॅपेक्स प्रकरणी आणखी दोन डाॅक्टरांची पोलीस चाैकशी करणार

अ‍ॅपेक्स प्रकरणी आणखी दोन डाॅक्टरांची पोलीस चाैकशी करणार

मिरजेतील अ‍ॅपेक्स रुग्णालयात ८७ कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयचालक डाॅ. महेश जाधव व त्याचा भाऊ मेंदू शास्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मदन जाधव यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूंसह रुग्णालय कर्मचारी व तीन रुग्णवाहिकाचालक अशा १३ जणांना अटक केली आहे. डाॅ. महेश जाधव यास मदत करणाऱ्या सांगलीतील एका डॉक्टरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पोलिसांचे म्हणणे ऐकण्यासाठी सत्र न्यायालयात बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. डाॅ. जाधव याने रुग्णालय सुरू करताना कागदोपत्री अनेक डाॅक्टरांची नियुक्ती दाखविली होती. मात्र उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची नातेवाइकांची तक्रार असल्याने पोलिसांनी कागदोपत्री नियुक्त संबंधित डाॅक्टरांचीही चाैकशी सुरू केली आहे. यासाठी सांगली-मिरजेतील आणखी दोन डाॅक्टरांना पोलिसांनी चाैकशीसाठी पाचारण केले आहे. अ‍ॅपेक्स कोविड रुग्णालयात डाॅ. जाधव याने केलेल्या गैरप्रकाराबाबत त्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याने संबंधित डाॅक्टर धास्तावले आहेत. डाॅ. जाधव यास मदत केल्याचे निष्पन्न झाल्यास आणखी काहीजणांवर कारवाईची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: In the Apex case, two more doctors will be chased by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.