शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत देशविरोधी घोषणा... त्यावरून मारामारी; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 18:07 IST

संबंधित तरुण एका बारमध्ये मद्यप्राशन करीत बसले होते. यावेळी मोबाईलवरील पाेस्ट पाहून त्याने धार्मिक घाेषणा दिल्या.

जत : मुचंडी (ता. जत) येथे बारमध्ये दारूच्या नशेत धार्मिक व देशविराेधी घोषणा दिल्याने केल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे मारामारीत रुपांतर झाले. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली आहे. मंगळवार दि. १४ राेजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी हाजीमलंग नबीसाहब नदाफ (रा. मुचंडी, ता. जत) व राजकुमार महादेव कोळी (रा. मुचंडी) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.राजकुमार कोळी, हाजीमलंग नदाफ यांच्यासह पाच ते सहा जण मुचंडी येथील एका बारमध्ये मद्यप्राशन करीत बसले होते. फिर्यादी राजकुमार हा मोबाईल बघत होता. मोबाईलवरील पाेस्ट पाहून त्याने धार्मिक घाेषणा दिल्या. याचवेळी हाजीमलंग नदाफ यानेही दारूच्या नशेत देशविराेधी घोषणाबाजी केली. त्यावरून तेथे एकच खळबळ उडाली. याचा फिर्यादी राजकुमार याने नदाफ याला जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. रात्री उशिरा फिर्यादी राजकुमार कोळी यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बुधवारी दुपारी पोलिसांनी हाजीमलंग नदाफ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान हा प्रकार दारूच्या नशेत व चेष्टेत घडला होता. यातून आपल्याला मारहाण झाल्याची फिर्याद हाजीमलंग नबीसाहब नदाफ याने जत पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार राजकुमार महादेव कोळी (रा. मुचंडी, ता. जत) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महेश मोहिते करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी