निर्मल हॉस्पिटलमध्ये अंमली पदार्थ विराेधी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:04+5:302021-06-29T04:19:04+5:30
मिरज : मिरजेतील निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्रातर्फे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. डॉ. चंद्रशेखर हळिंगळे ...

निर्मल हॉस्पिटलमध्ये अंमली पदार्थ विराेधी दिन साजरा
मिरज : मिरजेतील निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्रातर्फे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. डॉ. चंद्रशेखर हळिंगळे अध्यक्षस्थानी हाेते. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. चंद्रशेखर हळिंगळे म्हणाले की, व्यसन कोणत्याही प्रकारचे असू शकते. व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक नुकसान न भरुन येणारे असते. यावर आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असून, नातेवाईकांनी पुढाकार घेऊन व्यसनी लोकांना उपचारासाठी प्रवृत्त केले पाहिजे.
दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांनी सुरू केलेले व्यसनमुक्तीचे कार्य समाजास प्रेरक आहे. यावेळी निर्मल हॉस्पिटलचे कर्मचारी सागर जाधव, विनायक कवडे, माया कदम, माधुरी पुकाळे, वतन भोसले, सेजल बनसोडे, तेजस्विनी चव्हाण, धनश्री नांद्रेकर, इम्रान मुल्ला यांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त लघुनाटिका सादर केली.
यावेळी डॉ. नीशा चंद्रशेखर हळिंगळे यांच्यासह रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विनायक कवडे यांनी आभार मानले.