बोरगाव खूनप्रकरणी विरोधी फिर्याद; १३ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:03+5:302021-03-08T04:26:03+5:30

पोलिसांनी कवठेमहांकाळ तालुका युवक राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य गणपती नामदेव पाटील यांच्यासह १३ जण आणि इतर अनोळखी ...

Anti-Borgaon murder case; Crime against 13 persons | बोरगाव खूनप्रकरणी विरोधी फिर्याद; १३ जणांवर गुन्हा

बोरगाव खूनप्रकरणी विरोधी फिर्याद; १३ जणांवर गुन्हा

पोलिसांनी कवठेमहांकाळ तालुका युवक राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य गणपती नामदेव पाटील यांच्यासह १३ जण आणि इतर अनोळखी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जिल्हाधिकारी याचा बंदी आदेश असतानादेखील बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर पद्धतीने जमाव जमविण्यात आला होता. उपसरपंच निवडणुकीच्या कारणावरून प्रकाश वसंत पाटील व तुकाराम उत्तम पाटील यांना अमोल वसंत पाटील, किरण नामदेव पाटील, श्रीकांत भाऊसाहेब पाटील यांच्यासह अन्य लोकांनी मारहाण केली. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही. पांडुरंग काळे खूनप्रकरणी खासदार गटाच्या ३९ जणांवर खुनाचा, तर मारहाणप्रकरणी आमदार गटाच्या १५ ते २० जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

Web Title: Anti-Borgaon murder case; Crime against 13 persons