शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

गॅस्ट्रोसदृश साथीचा आणखी एक बळी

By admin | Updated: November 23, 2014 00:52 IST

मिरजेत साथ : रुग्णांची संख्या तीनशेवर

मिरज : मिरजेत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ कायम असून, आज शनिवारी अब्दुल लतीफ शेख (वय ६०) या वृद्धाचा गॅस्ट्रोसदृश आजाराने मृत्यू झाला. शासकीय व खासगी रुग्णालयांत आजही मोठ्या संख्येने उपचारासाठी रुग्ण दाखल झाल्याने रुग्णांची संख्या तीनशेवर पोहोचली आहे.शहरात दूषित पाण्यामुळे कॉलरा व गॅस्ट्रो या साथीच्या आजारांची तीव्रता कायम आहे. खासगी रुग्णालयांतही उपचारासाठी रुग्णांची गर्दी आहे. म्हैसाळ रोड झोपडपट्टीतील अब्दुल लतीफ शेख या वृद्धाचा आज गॅस्ट्रोसदृश आजाराने मृत्यू झाला. हातगाडीवर फळविक्री करणारे शेख दोन दिवस जुलाब व उलट्यांमुळे आजारी होते. घरी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शेख यांचा मुलगा व नातीलाही जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत गॅस्ट्रोमुळे तीन वृद्धांचा मृत्यू झाला आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तिघांचाही मृत्यू गॅस्ट्रोने नव्हे, तर वेगवेगळ्या आजाराने झाल्याचा दावा केला. आज शासकीय रुग्णालयात ४२ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. रुग्णालयात जागा नसल्याने अनेक रुग्णांची उपचारासाठी धावपळ सुरू होती. जलवाहिनीची गळती सापडली नसल्याने दूषित पाणीपुरवठा थांबला नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा हतबल झाली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या बाह्मणपुरी, वखारभाग, टाकळी रोड परिसरात एकाच कुटुंबातील अनेकजणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. दूषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी महापालिकेच्या ड्रेनेज व पाणीपुरवठा विभागाचे प्रयत्न सुरू होते. दूषित पाणीपुरवठा अद्याप थांबला नसल्याने नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दगाव वेस परिसरातील जुनी जलवाहिनी बंद करून नवीन जलवाहिनीचे काम सुरू केले आहे. शहरातील म्हैसाळ वेस, उदगाव वेस, नदी वेस, एसटी स्टँड या भागातील ड्रेनेज व मुख्य ड्रेनेज वाहिनी म्हैसाळ वेस, पंचशील चौक येथे तुंबल्याने या भागातील सांडपाणी मोठ्याप्रमाणात साचले होते. परिसरातील तक्रारीमुळे येथील ड्रेनेज वाहिन्या प्रवाहित करण्यात आल्या. कोकणे गल्लीतील खंदकात साचलेल्या पाण्याचा उपसा पंपाद्वारे करण्यात येत आहे. रुग्णांना औषध व क्षार संजीवनीची पाकिटे देण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी दिली.