शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: झरे बँक लॉकर फोडणाऱ्या टोळीतील आणखी एकास अटक, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:54 IST

सव्वातीन कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त

सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लॉकर फोडणाऱ्या टोळीतील संशयित आदेश बाबूराव शर्मा (वय ३०, रा. हसनपूर, जि. बदायू, उत्तर प्रदेश) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सातारा जिल्ह्यात अटक केली. त्याच्याकडून १३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंत टोळीतील सात जणांना अटक केली आहे.झरे येथे दि. ७ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उत्तर प्रदेशातील टोळीने सांगली जिल्ह्यातील साथीदारांच्या मदतीने जिल्हा बँकेच्या शाखेतील पाठीमागील खिडकीची काच फोडून गज गॅस कटरने कापले. त्यानंतर आत प्रवेश करून लॉकर रूममधील २२ लॉकर गॅस कटरने तोडले. ग्राहकांनी ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरी केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या टोळीचा छडा लावण्यात यश मिळवले. पथकाने संशयित राहुल रंजमीश शर्मा (रा. ककराला, जि. बदायू, उत्तर प्रदेश), विश्वजित विजय पाटील (रा. बांबवडे, ता. पलूस), संकेत अरुण जाधव (रा. बलवडी, ता. खानापूर), इजाज राजू अत्तार (रा. आमणापूर, ता. पलूस), अस्लम ऊर्फ टनटन मिठ्ठोरी खान (रा. ककराला, उत्तर प्रदेश), शकील अकबर कुरेशी (रा. इस्लामनगर, उत्तर प्रदेश) या सहा जणांना अटक केली होती.गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाला टोळीतील संशयित आदेश शर्मा हा सातारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर सॅकमध्ये १३ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख १० हजार ५०० रुपये, असा एकूण १३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळाला. चौकशीत त्याने दोन महिन्यांपूर्वी चोरी केल्याची कबुली दिली.गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कळेकर, कर्मचारी संदीप नलावडे, संदीप गुरव, सागर टिंगरे, अमिरशा फकीर, नागेश खरात, अतुल माने, सागर लवटे, अनिल कोळेकर, दरिबा बंडगर, सोमनाथ गुंडे, रणजित जाधव, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, उदयसिंह माळी, अमर नरळे, अरुण पाटील, महादेव नागणे आदींच्या पथकाने कारवाई केली.

सव्वातीन कोटींहून अधिक मुद्देमाल जप्तस्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने यापूर्वी अटक केलेल्या सहा जणांकडून ३ कोटी २५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अद्याप टोळीतील काही जण पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Bank Heist: Another Arrest, ₹13 Lakh Recovered

Web Summary : Another suspect in the Sangli bank locker theft was arrested in Satara, with ₹13 lakh recovered. The gang broke into 22 lockers, stealing valuables. This brings the total arrests to seven.