सांगली : मुंबईत जहाँगीर आर्ट गॅलरीच्या धर्तीवर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् येथे स्वतंत्र कलादालन उभारण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. हे कलादालन चार मजली असेल व त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. ते सोमवारी सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठात कलाविश्व महाविद्यालयात आयोजित ६५ व्या राज्य कला प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते संदीप आवटी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, ज्येष्ठ कलाशिक्षक जी. एस. माजगावकर, कला संचालनालयाचे संचालक किशोर इंगळे, कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील, प्रदर्शन अधिकारी स्मिता किंकळे, समन्वयक विजय बोंदर, आदी उपस्थित होते.यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन झाले. माजगावकर यांचा यावेळी सपत्नीक सत्कार झाला. पालकमंत्री पाटील म्हणाले, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी दहावीनंतर कला क्षेत्र निवडावे असा प्रयत्न आहे. कलेला प्रोत्साहनासाठी कला प्रदर्शनातील बक्षिसांची रक्कम वाढविली आहे. कला संचालनालयाला अनेक वर्षांनी संचालकांची नियुक्ती केली आहे. गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. मुंबईत केंद्रीय विश्वविद्यालय मिळाल्याने निधी आणि अभ्यासक्रम वाढवून मिळतील. विक्रोळी येथे ते सुरू केले आहे. कलेसाठीही स्वतंत्र मंडळ स्थापन केले आहे. तेच सर्व परीक्षा घेईल. खासदार पाटील म्हणाले, सांगलीला कलेची परंपरा आहे. नवी पिढी ती पुढे नेईल याचा विश्वास आहे.
सर्व खर्च शासन करेलज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांना कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या कोणत्याही शहरात भेटीसाठी सपत्नीक प्रवासाचा विमानप्रवासाचा सर्व खर्च शासन करेल अशी घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
प्रवासाचा खर्च शासन करणारमंत्री पाटील यांनी सांगितले की, सांगलीतील हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी यावे. त्यासाठीचा एसटी किंवा खासगी वाहनाचा, तसे विद्यार्थ्यांच्या चहा-नाश्त्याचा खर्च आपण करू. तसे प्रस्ताव तातडीने शाळांनी द्यावेत. यासाठी मंत्री पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने परिपत्रक काढण्याची सूचना केली.
१२७५ कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवडराज्यभरातील कला संस्थांमधून ३ हजार ४९० विद्यार्थ्यांच्या ५ हजार ६८० कलाकृती प्रदर्शनासाठी प्राप्त झाल्या. निवड समितीने त्यातून १ हजार २७५ उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे. या नितांत सुंदर कलाकृती सांगलीकरांना विनामूल्य पाहण्याची संधी प्रदर्शनाच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.
Web Summary : Chandrakant Patil announced a new four-story art gallery at JJ School of Art, modeled after Jehangir Gallery. The state government aims to boost art education and has increased prize money for art exhibitions. 1275 artworks were selected for exhibition.
Web Summary : चंद्रकांत पाटिल ने जेजे स्कूल ऑफ आर्ट में जहांगीर गैलरी की तरह एक नई चार मंजिला आर्ट गैलरी की घोषणा की। राज्य सरकार का उद्देश्य कला शिक्षा को बढ़ावा देना है और कला प्रदर्शनियों के लिए पुरस्कार राशि बढ़ा दी गई है। प्रदर्शनी के लिए 1275 कलाकृतियों का चयन किया गया।