स्वातंत्र्यसैनिक सन्मान समितीची वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST2021-04-02T04:26:47+5:302021-04-02T04:26:47+5:30

सांगली : स्वातंत्र्यसैनिक सन्मान समितीची वार्षिक सभा शांतिनिकेतनमध्ये झाली. अध्यक्षस्थानी ॲड. सुभाष पाटील होते. ते म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात योगदान ...

Annual meeting of the Freedom Fighters Honor Committee | स्वातंत्र्यसैनिक सन्मान समितीची वार्षिक सभा

स्वातंत्र्यसैनिक सन्मान समितीची वार्षिक सभा

सांगली : स्वातंत्र्यसैनिक सन्मान समितीची वार्षिक सभा शांतिनिकेतनमध्ये झाली. अध्यक्षस्थानी ॲड. सुभाष पाटील होते. ते म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेले अनेक सैनिक अजूनही शासकीय लाभापासून वंचित आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी. कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत घ्यावे. हुतात्म्यांना आधार द्यावा.

स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली. स्वातंत्र्यसैनिकांना अन्य राज्यांप्रमाणे वाढीव निवृत्तीवेतन मिळावे, घर नसणाऱ्यांना घर बांधणीसाठी दहा लाख रुपये द्यावेत अशा मागण्याही केल्या.

स्वातंत्र्यसैनिकांना वैद्यकीय उपचारांसाठी वर्षाकाठी दहा हजार रुपये मिळतात, पण त्यासाठी शल्यचिकित्सकांकडे बिले सादर करावी लागतात. उतार वयात ही धावपळ सोसण्यासारखी नसल्याने दहा हजारांची मदत थेट द्यावी अशी मागणीही केली.

सभेला रामचंद्र पवार, रघुनाथ नार्वेकर, प्रा. नंदकुमार सुर्वे, डॉ. प्रमोद लाड, अरुण दांडेकर, आनंद कमते, जयसिंग सावंत, रोहित चिवटे, अनिल माने, अशोक पोरे, रामचंद्र पवार, नारायण जाधव, निलेश भंडारे आदी उपस्थित होते.

Web Title: Annual meeting of the Freedom Fighters Honor Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.