शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी तालुक्यातील दोन सरपंच पदांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:15 IST

राज्य निवडणूक आयोगाकडून एप्रिल, मे व जून 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणूकीत नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्यामुळे ग्रामपंचायत गठीत न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता तसेच थेट निवडणुकीव्दारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट निवडणुकांकरीता संगणीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआटपाडी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची पोट निवडणूक कार्यक्रम जाहीरकामथ, बाळेवाडी रिक्त सरपंच पदांसाठी पोटनिवडणूक

सांगली  : राज्य निवडणूक आयोगाकडून एप्रिल, मे व जून 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणूकीत नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्यामुळे ग्रामपंचायत गठीत न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता तसेच थेट निवडणुकीव्दारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट निवडणुकांकरीता संगणीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील कामथ व बाळेवाडी या ग्रामपंचायतींची थेट निवडणुकीव्दारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदाच्या पोट निवडणुकांकरीता कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम निर्गमित झाल्यापासून दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजीचे रात्री 12 वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत दिनांक 20 फेब्रुवारी 2019 ते 25 मार्च 2019 पर्यंत अस्तित्वात राहील. ही माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.रिक्त सरपंच पदाच्या पोट निवडणुकांकरीता निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक - शुक्रवार, दिनांक 22 फेब्रुवारी 2019. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ - मंगळवार, दिनांक 5 मार्च 2019 ते शनिवार, दिनांक 9 मार्च 2019 सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ - सोमवार, दिनांक 11 मार्च 2019 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ - बुधवार, दिनांक 13 मार्च 2019 दुपारी 3.00 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ - बुधवार, दिनांक 13 मार्च 2019 दुपारी 3.00 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक - रविवार, दिनांक 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक - सोमवार, दिनांक 25 मार्च 2019. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक - गुरूवार, दिनांक 28 मार्च 2019

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूकSangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत