दुधगाव येथे मंगळवारी वीर सेवा दलाचा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:01+5:302021-01-25T04:28:01+5:30

दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथे वीर सेवा दलाचा ४२ वा वर्धापनदिन, कृतज्ञता, प्रेरणा व चेतना सन्मान सोहळा दिनांक ...

Anniversary of Veer Seva Dal on Tuesday at Dudhgaon | दुधगाव येथे मंगळवारी वीर सेवा दलाचा वर्धापन दिन

दुधगाव येथे मंगळवारी वीर सेवा दलाचा वर्धापन दिन

दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथे वीर सेवा दलाचा ४२ वा वर्धापनदिन, कृतज्ञता, प्रेरणा व चेतना सन्मान सोहळा दिनांक २६ जानेवारी रोजी आयाेजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात दान चिंतामणी बाबासो नानगोडा पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण, कृतज्ञता सन्मान व चेतना सन्मान सोहळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

दुसऱ्या सत्रात वीराचार्य स्मृती ग्रंथ प्रकाशन, आदर्श पाठशाळा शिक्षक सन्मान सोहळा प्रमुख वक्ते, विचारवंत इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते व माजी उपअधीक्षक श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनी दिली. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एन. जे. पाटील यांनी केले आहे.

Web Title: Anniversary of Veer Seva Dal on Tuesday at Dudhgaon